ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
मुकणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील, नाशिक जिल्ह्यातल्या, इगतपुरी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे. गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३०२१ इतकी आहे तसेच येथील घरांची एकूण संख्या ३६९ इतकी आहे. मुकणे गाव नाशिक जिल्ह्यापासून २५ कि.मी. तसेच इगतपुरी पासून १६ कि.मी. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून साधारणपणे १५० किमी वर स्थित आहे. मुकणे पिनकोड ४२२४०३ हा असून त्याचे पोस्ट ऑफिस मुकणे येथे आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक कुंभमेळ्याचे ध्वजारोहण मुकणे गावाजवळिल कावनई या गावात झाले कावनई या गावात कपिलेश्वर तीर्थक्षेत्र आहे,व कामाक्षी माता मंदिर आहे कावनई येथे पण मोठ्या संख्येने भाविक लोक येत असतात. त्यानंतर साधू-महंत नाशिकच्या कुंभमेळ्यात पोचत. मात्र १९५६ पासूनच्या सिंहस्थ पर्वणीपासून या परंपरेत खंड पडला. मात्र नुकत्याच २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात ही परंपरा पुन्हा सुरू करून कुंभमेळा पर्वणी ध्वजारोहन कावनई येथे तीर्थक्षेत्रावर करण्यात आले.
मुकणे २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| घटक | माहिती |
|---|---|
| गावाचे नाव | मुकणे |
| तालुका / जिल्हा | इगतपुरी, जि. नाशिक |
| स्थापना दिनांक | १५ फेब्रुवारी १९५७ |
| एकूण लोकसंख्या (२०११) | ३०२१ |
| एकूण कुटुंबे | ३६९ |
| प्रमुख व्यवसाय | शेती, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग |
| शैक्षणिक सुविधा | १ ली ते १० वी पर्यंत शाळा, ४ अंगणवाड्या |
| प्रमुख वाड्या / वस्त्या | राजवाडा, कातकरी वस्ती, घोबाचीवाडी |
| ग्रामसेवक | श्री. उमेश वामनराव खैरनार |
| ग्रामपंचायत कर्मचारी | सुनिल राव (लिपिक), अंकुश राव (संगणक ऑप.), इ. |
| महत्त्वाची ठिकाणे | मुकणे धरण, कपिलेश्वर मंदिर (कावनई), कामाक्षी माता मंदिर |
| शासकीय योजना | प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, वृध्दापकाळ पेन्शन, निराधार योजना |
| इतर उपक्रम | घंटागाडी, रस्ते काँक्रीटीकरण, गटार योजना |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |